logo

साखळी, फाट्याजवळ, झाला अपघात, एक, ठार, एक, जख्मी !




वसीम शेख AIMA news बुलढाणा



साखळी फाट्याजवळ झाला अपघात दूध व्यवसाय करणाऱ्या एका युवकाचा साखळी फाट्याजवळ दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. २८ ,४ ,२०२४ घडलेल्या अपघातात मृतकाचे नाव शुभम अशोक पाटील (वय 30) आहे. शुभम बुलढाण्यातील चैतन्यवाडीत राहतो. केळवद येथे गोठ्यातून दुध घेऊन साखळी येथील अमर डेअरी वर दुध टाकण्याचे काम शुभम रोज करायचा. आज सुद्धा तो साखळी फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमर डेअरी वर दुध टाकून परत बुलढाण्याकडे निघाला. परंतु त्याचवेळी साखळीकडून आलेल्या भरधाव दुचाकीने शुभमच्या शाईन गाडीला जोरदार धडक दिली. शुभमच्या छातीला आणि डोक्याला जबर मार लागला. मिळालेल्या माहितीनुसार ज्याने धडक दिली तो दुचाकीस्वार विशाल देविदास चाटे (रा. साखळी ) सुद्धा जखमी झाला. दोघांनाही रुग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु शुभमला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशालवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने पोहोचून कार्यवाही केली. शुभमच्या मृत्यूने दुध व्यवसायिकांमध्ये शोकव्याप्त आहे.

185
9566 views